जळगाव मिरर | २३ मार्च २०२५
पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे येथे खरिपाच्या हंगामात उत्पन्न चांगले न आल्याने कर्जाचा डोंगर कसा फेडावा या विवंचनेत सातगाव येथील शेतकरी समाधान महादु महाले (वय ३५) या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात जाऊन विष प्राशन करत जीवनयात्रा संपवली आहे. आपला पती घरी येत नाही म्हणून शेतात बघण्यासाठी काहींना पाठवले. त्यावेळी समाधान महाले औषध घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णात दाखल करण्यात आले. मात्र रात्री दोन वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा एक मुलगी आहे.
दोन बँकांचे जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये कर्ज असल्याने काही दिवसांपासून कर्जाच्या विवंचनेत ते फिरत होते. दररोज पत्नी त्यांच्यासोबत शेती जात असत. मात्र चार दिवसापूर्वी पत्नीला न सांगताच सकाळीच शेतामध्ये निघून गेले आणि विष प्राशन केले. तिन दिवस मृत्यूशै झुंज सुरू असताना रात्री त्यांचे निधन झाले. शासनाने महाले कुटुंबावरील असलेले बँकेचे कर्ज माफ करावे आणि शासन दरबारी त्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




















