चाळीसगाव : कल्पेश महाले
अमृत भारत स्टेशन योजनेत चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासाचा पायाभरणी समारंभ रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाला. यावेळी चाळीसगाव रेल्वे स्थानकात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ३९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
अध्यक्षस्थानी खासदार उन्मेश पाटील होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री एम. के. अण्णा पाटील माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे, आमदार मंगेश चव्हाण, स्वातंत्र्य सैनिक शिवाजीराव मराठे, भाजपा प्रदेश सचिव अजय भोळे, जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, डीआरयूसीसी मेंबर के. बी. साळुंखे, तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, माजी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, उध्दवराव महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव मराठे, जगन महाजन, सद्गुरु ब्रास बॅण्ड संचालक गुड्डू गुरव, पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता डीवायएसपी विजय चौधरी यांचे आई व वडील नथ्थू चौधरी तसेच विविध गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केली. प्रोजेक्ट मॅनेजर एम. के. मिना यांनी प्रास्ताविक केले.




















