
जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील नशिराबाद येथील ७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ५० वर्षीय इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील नशिराबाद पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका ५० वर्षीय इसमाने ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस घरी खेळायला बोलवत अश्लील वर्तन केल्या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बाळू वासुदेव महाजन (वय ५०) यांच्याविरोधात नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजेंद्र भास्करराव साळूखे हे करीत आहेत.




















