जळगाव मिरर | ४ नोव्हेबर २०२३
नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. यामध्ये ७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रीय भूकंप मापन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील जाजरकोट जिल्ह्याच्या लामिडांडा परिसरात होता नेपाळमधील दोन जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
रुकुम पश्चिममध्ये 36 तर जाजरकोटमध्ये 92 जणांचा मृत्यू झाला आहे. डीआयजी कुवीर कडायतेन यांनी मृत्यूच्या आकडेवारीला दुजोरा दिला आहे. काठमांडू पोस्टनुसार, भूकंपात आतापर्यंत 140 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. भूकंपाचा परिणाम भारतातही दिसून आला. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि बिहारची राजधानी पटना येथे भूकंपाचे धक्के जाणवले. भारतात भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी तिन्ही सुरक्षा यंत्रणांना बचाव कार्यात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत. पीएम ऑफिसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दुख: व्यक्त केले आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळ, ग्वाल्हेर, जबलपूर, सतना आणि रीवा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. राज्यातील आगर माळवा आणि मुरैना जिल्ह्यांतील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार, राज्यात कुठलीही हानी झाल्याची माहिती नाही.