
पुणे : वृत्तसंस्था
लोक पैशासाठी काय करतील हे कुणीही सांगू शकत नाही पुण्यातील पिंपरी भागात अवघ्या ७ वर्षीय मुलाचा खून करण्यात आला आहे. एका बांधकाम व्यवसायिकाचा मुलगा होता त्याचा मृतदेह भोसरी औद्योगिक वासाहतीतील एका पडक्या इमारतीच्या टेरेसवर सापडला आहे.
मुलाच्या वडिलांना आरोपींनी तब्बल 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्याने आरोपींनी चिमूकल्याला ठार मारले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. आदित्य ओगले (वय 7) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तो पिंपरीतील मसुलकर कॉलनी येथे राहत होता. आदित्यच्या अपहरणाबाबत वडील गजानन श्रीकांत ओगले (वय 49) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल केली होती. मात्र, शोध लागण्यापूर्वीच त्याचा मृतदेह सापडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यचे वडील गजानन ओगले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा मुलगा आदित्य हा गुरुवारी सायंकाळी खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो परत आला नाही. बराच वेळ होऊनही तो घरात परत आला नसल्याने त्याचे वडील गजानन यांनी पिंपरी पोलिसांत तक्रार दिली.
अज्ञात व्यक्तीचा फोन
काही दिवसांनी ओगले यांना काही दिवसांत एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्यांना 20 कोटी रुपयांची खंडणी आरोपींनी मागितली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी एका मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता मुलाचा खून झाला असल्याचे कळले. शुक्रवारी आदित्य याचा मृतदेह भोसरी औद्योगिक वासाहितीतील एका पडक्या इमारतीच्या टेरेसवर आढळला. पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















