जळगाव मिरर / २२ नोव्हेंबर २०२२
देशाची ओळख च कृषिप्रधान राष्ट्र म्हणून जग भर मिरवली जात असतांना शेतकऱ्यांना अश्या पद्धतीने शेतीस वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेला घास च हिसकवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे .आधीच देशात महागाई ने डोकं वर काढलेले असतांना चालू शेती बिल भरण्याच्या वलग्ना करून अव्वाच्या सव्वा बिले वसुली सरकार कडून तोंड दाबून बुक्क्यांचा मार देऊन वसूल करण्यात येत आहे. ज्यांना चालू बिल 2 हजार आले आहे त्यांच्याकडून सरासरी 5 हजार ते 7 हजार रु कोणत्या आधारावर वसूल करण्यात येत आहे. असा मनसे जिल्हा सचिव डॉ विजयानंद कुलकर्णी यांनी जाहीर सवाल सरकार व ऊर्जामंत्री यांना केला आहे.
एका ट्रान्सफार्मर वर 10 कनेक्शन असतांना 70 टक्के ग्राहकांनी बिल भरल्या शिवाय वीज पुरवठा न करण्याचा हा अजब फतवा काढून जे ग्राहक 4 दिवसापासून वीज बिल भरणारे अजून ही वंचित आहे ही महावितरण विभागाची हुकूमशाही व दानाशाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सपशेल सहन करणार नाही . त्यामुळे जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या दोन तीन दिवसांत वीजपुरवठा तात्काळ सुरू न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महावितरण विभागाला मनसे चा दणका दाखवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी आज जामनेर वरिष्ठ अभियंता यांना निवेदनातून दिला आहे.
यावेळी मनसे जिल्हा सचिव डॉ विजयानंद कुलकर्णी , जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील , जामनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील , तालुका उपाध्यक्ष आशुतोष पाटील , सागर जोशी , अरुण भोसले , योगेश माळी , नितिन भोपळे , जीवन भोपळे , भूषण माळी , लोकेश महसूरकर, भूषण माळी , मनीष माळी , अतुल माळी ,अंकुश पवार , दत्ता पाटील , नाना शिंदे , किशोर पाटील , जगदीश कुरकुरे , किरण सौदागर , मुकेश जाधव ,गोविंदा बनकर , आशपाक देशमुख , वाल्मिक कोळी , राहुल शिंदे , अमोल पाटील , राम भोसले , योगेश जोशी , लोकेश जोशी , संदीप जोशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते