जळगाव मिरर / २२ नोव्हेंबर २०२२
पेट्रोलपंपच्या नोझल मशिनच्या प्रमाणपत्रासाठी ६ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पाचोरा येथील वैद्यमापन शास्त्र विभागाच्या निरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, पहूर येथील एका पेट्रोलपंप धारकाला आपल्याकडील चार नोझल मशिनचे स्टँपींग करून प्रमाणपत्र हवे होते. यासंदर्भात त्यांनी पाचोरा येथील वैद्यमापन शास्त्र विभागाकडे अर्ज केला होता. येथील निरिक्षक विवेक सोनू झरेकर (वय – ५४) यांनी त्यांना प्रत्येक नोझलसाठी १ हजार ५०० रुपये याप्रमाणे एकूण ६ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. या संदर्भात संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जळगाव येथील कार्यालयाशी संपर्क साधला. ए. सी. बी. च्या पथकाने सापळा रचून वैद्यमापक शास्त्र विभागाचे निरीक्षक विवेक झरेकर यांना लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे डी. वाय. एस. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. के. बच्छाव व एन.एन. जाधव, पोलिस नाईक ईश्वर धनगर, पोलिस कॉन्स्टेबल राकेश दुसाने, पोलिस कॉन्स्टेबल सचिन चाटे यांच्या पथकाने केली.