अमळनेर : विक्की जाधव
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील काही पदाधिकारी बदलले असून अमळनेर तालुका प्रमुखपदी श्रीकांत पाटील व शहरप्रमुखपदी सुरज परदेशी यांची वर्णी लागली आहे.
पूर्वीचे शहर प्रमुख संजय पाटील हे शिंदे गटात गेल्याने सद्द्याची परिस्थिती लक्षात घेऊन कार्यकारिणीत बदल करण्यात आले आहेत. तालुका प्रमुख विजय पाटील यांना उपजिल्हा समन्वयक तर कल्याण पाटील यांना उपजिल्हाप्रमुख, नरेंद्र ठाकूर याना उपजिल्हा संघटक म्हणून नियुक्त करण्यात आले असून. नूतन कार्यकारिणीत विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब पवार, तालुका संघटक नितीन निळे, उपतालुका प्रमुख चंद्रशेखर भावसार, शहर समन्वयक उमेश अंधारे, शहर संघटक मोहन भोई, उपशहर प्रमुख अनंत निकम यांचा समावेश आहे.