अमळनेर : विक्की जाधव
दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू डॉ. सय्यदना आलीकदर मुप्फदल सैफुद्दीन साहेब(त. ऊ.श.) यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना सायकलीचे वाटप करण्यात आले.
दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू डॉ. सय्यदना आलीकदर मुप्फदल सैफुद्दीन साहेब (त. ऊ.श.) यांच्या वाढदिवसानिमित्त दाऊदी बोहरा समाजाच्या माध्यमाने शाहआलमनगर मध्ये राहणारे फातिमाबी शेख हमीद शिकलीकर व प्रताप मिल चाळमध्ये राहणारे दिव्यांग बंधू कांतीलाल भिवा कुंभार यांना तीन चाकी सायकलीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आमील साहेब शेख नुरुद्दीन जमाली, समाजाचे अध्यक्ष शेख ऐहसानभाई बुरहानी, सेक्रेटरी शेख मोहम्मद करमपुरवाला, मुल्ला अहमद बुरहानी, इनायतभाई कय्युमी, मंगलग्रह मंदिराचे विश्वस्त गिरीश कुलकर्णी आणि बुरहानी गार्डस इंटरनॅशनलचे कॅप्टन ताहा बुकवाला, अजिज बोहरी, मुस्तफा कलकत्तावाला, हुजेफा ईज्जी, अब्दुलकादिर जावेद इ सहभागी होते. अशी माहिती दाऊदी बोहरा समाजाचे पीआरओ मकसूद बोहरी यांनी दिली.