जळगाव : प्रतिनिधी
भारतामध्ये युवतीपासून ते थेट चिमुकलीपर्यंत अत्याचाराचे प्रमाणात वाढ होत आहे. या काळिमा फासणाऱ्या घटना आपल्या परिसरातही घडत आहे. परंतु न्यायालयात न्याय हा उशीर का होईना पण थेट भेटत असल्याने न्यायालयाचा विश्वास अजूनही कमी झालेला नाही.
जळगावातील आठ वर्षांच्या गतिमंद चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अखेर शिक्षा सुनावण्यात आली आहे. नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. जळगाव जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला आहे. जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणारी आठ वर्षीय मतिमंद चिमुकली ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. चिमुकली घरी असताना गावातील आरोपी रमेश मंगा कळस्कर याने तिला घरात बोलावले. त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग करुन अत्याचार केल्याचा आरोप झाला होता.
नेमके काय आहे प्रकरण?
धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी पोलीस ठाण्यात रमेश मंगा कळस्कर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला जळगाव आणि सत्र न्यायालयात असताना गुन्ह्यात 9 साक्षीदार तपासण्यात आले. यात पिडीत, पीडितेचे वडील, पंच, तपासी अंमलदार आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
सांकेतिक भाषेद्वारे पीडितेची साक्ष
या खटल्यात पीडित चिमुकली ही मतिमंद असल्याने तिची साक्ष नोंदण्यासाठी गुजराती मूकबधिर विद्यालयाचे विशेष शिक्षक यांच्या मदतीने सांकेतिक भाषाद्वारे, इशारे आणि खाणाखुणाच्या आधारे नोंदवण्यात आली. घटनेच्या दिवशी पीडित चिमुकली ही घाबरलेल्या अवस्थेत रडत आरोपीच्या घरातून बाहेर पडताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे अत्याचार करणारा रमेश मंगा कळस्कर याला दोषी ठरवण्यात आले.
न्यायमूर्ती खडसे यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता आरोपी रमेश कळस्कर याला विविध कलमान्वये नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि सहा हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.