महाविद्यालयीन तरुण तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी काय करतील हे सारे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहत असाल पण असा काही व्हिडीओ व्हायरल होतील असे कुणालाही ठाऊक नसेल. प्रेमात सहजा सहजी कुठलेही मुलगी कुठल्याही मुलाला होकार देत नाही. त्यासाठी मुलांना खूप पापड बेलावे लागतात. असाच एक मुलगा आणि मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
हा एक क्लासरुमचा व्हिडिओ आहे. ज्यात अनेक विद्यार्थी दिसतं आहेत. पण एका क्लासरुममधील बेंचवर मुलगी बसली आहे. त्या मुलीच्या समोर एक मुलगा बसला आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन आहे. तर हा व्हिडिओ नीट बघा तो मुलाच्या मांडीवर मुलीने पाय ठेवले आहेत. एवढंच नाही तर तो मुलगा त्या मुलीचे पाय दाबताना दिसतं आहे. भर क्लासरुममध्ये मुलीचं हे कृत्य पाहून कोणी तरी हा व्हिडिओ बनवला.
आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तो मुलगा पाय दाबत असताना मुलगी मात्र नॉनस्टॉप बोलतं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील bihari.broo या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्स वेगवेगळ्या कंमेट्स करत आहेत. मुलाला असं मुलीचं पाय दाबताना बघून नेटकरी त्या मुलाची मजा घेतं आहे. विशेष म्हणजे क्लासरुममध्ये इतर विद्यार्थी असतानाही या मुला -मुलीचे हे कृत्य पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
