जळगाव मिरर / २८ नोव्हेंबर २०२२
तुम्ही नेहमी तरुणाची हाणामारी पाहिली असेल पण राज्यात तरुणीची जोरदार हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ती घटना औरंगाबाद येथील दोन तरुणी एकमेकात भिडले होते त्यांचे व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन मुलींनी एका मुलीला चांगलीच मारहाण केलीय. विशेष म्हणजे मुलीचे केस ओढत त्या मुलीला इतर दोन मुलींनी बेल्टने मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येतय.
यावेळी आजूबाजूला उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची भांडण सोडवण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली. दोन मुलींनी त्या मुलीला नेमके कशामुळे मारले हे मात्र समजू शकले नसले तरी मुलींच्या मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मुलींची हाणामारी चालू असताना महाविद्यालयाच्या इतरही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. बघ्यांनी फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. हाणामारी करणाऱ्या विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. एरव्ही मुलांचे अशा प्रकारे भांडण झाल्याचे आपण नेहमी बघतो पण आता मुलींमध्ये देखील अशा प्रकारची फ्री स्टाईल हाणामारी पहायला मिळतेय.
यापूर्वी नाशिकच्या एका महाविद्यालयात मुलींमध्ये राडा झाला होता.दोन मुलींमध्ये बसण्यावरून वाद झाला. यावेळी कँटीन चालकांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर या मुली भांडत भांडत बाहेर पडल्या. यावेळी क्षुल्लक कारणाचे रूपांतर हाणामारीत होत. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या एका कॉलेजमध्ये हा तुफान राडा झाला आहे. तर व्हिडिओत दिसणाऱ्या दुसऱ्या दोघी एकमेकींच्या झिंज्या उपटत असताना दिसत आहे. तर दुसरीकडे सकाळची वेळ असल्याने कॉलेजचा हजारो विद्यार्थ्यांचा गराडा या तरुणींचे भांडण पाहत व्हिडिओ काढत असल्याचे दिसत होते.