मेष
तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. एखादे कायदेशीर काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते वेळेत पूर्ण करा. अनावश्यक खर्च टाळा.
वृषभ
कामाच्या शोधात असलेल्या लोकांना आज काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुम्हाला यश मिळेल. त्यामुळं आज तुमचे मन प्रसन्न राहील. आज तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याला दिलेले वचन सहज पूर्ण करू शकाल.
मिथुन
आजचा दिवस तुमची प्रतिष्ठा वाढवणार आहे. काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला आज अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागला तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. तसेच आज तुमच्या अधिकार्यांशी समन्वय राखा.
कर्क
आज तुमच्या व्यवसायात चांगली तेजी येईल. तसेच तुमची नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. मित्रांच्या मदतीने तुमची काही कामे पूर्ण होऊ शकतात. अध्यात्मात तुमची रुची वाढल्याने तुम्ही आनंदी व्हाल.
सिंह
आज आरोग्याबाबत सिंह राशींच्या लोकांना जागरूक राहण्याची गरज आहे. तुम्ही काही नवीन काम करत असाल तर तुम्हाला अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल. व्यवसाय करताना कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका.
कन्या
कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. आज तुमच्या रक्ताची नाती अधिक बळकट होतील. भागीदारीच्या कोणत्याही कामात तुम्हाला आज यश मिळेल. आज तुमच्या नेतृत्व क्षमतेला चालना मिळेल. तसेच तुमच्या महत्वाच्या कामांना आज गती मिळेल.
तुळ
आजचा दिवस तुळ राशींच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ करेल. बोलण्यात आणि वागण्यात गोडवा ठेवावा लागेल. सेवा क्षेत्राशी संबंधित लोकांना आज नवी संधी मिळेल.
वृश्चिक
वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. तुम्हाला दुसऱ्याकडून पैसे घेणे टाळावे लागेल, अन्यथा समस्या येऊ शकते. दुसऱ्याशी बोलताना विचारपूर्वक बोला.
धनु
धनु राशींच्या लोकांना घाईघाईत कोणताही निर्णय घेणं टाळावं लागेल. तुम्हाला आज तुमच्या वरिष्ठ सदस्यांचे सहकार्य आणि सहवास भरपूर प्रमाणात मिळेल. तुमचे महिमा कोणाशी असलेले मतभेद दूर होतील.
मकर
मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बंधुभावाची भावना वाढीस लागेल. तुम्हाला काही नवीन लोकांशी आज संवाद साधता येईल. तुमचे कोणतेही काम वेळेवर पूर्ण होईल, त्यामुळे तुमचे धैर्य वाढेल. ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता ते काम पूर्ण होईल.
कुंभ
आज लोककल्याणाची भावना तुमच्यात राहील. तसेच आज सहलीला जाण्याची संधी मिळेल. आज कुटुंबातील वातावरण एखाद्या उत्सवासारखे असेल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज मोठ्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तुम्ही कोणत्याही मोठ्या समस्येतून सहज बाहेर पडू शकता.
मीन
आजचा दिवस मीन राशींच्या लोकांसाठी आनंददायी असेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या आवश्यक कामांना गती मिळेल. तसेच तुम्हा आज काही सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आज तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.