अमळनेर : प्रतिनिधी
उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने शहर सुरक्षित झाले आहे. कॅमेऱ्यांचे मालक जनताच आहे. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. अधिकारी दोन वर्षांत बदलतात; मात्र ही यंत्रणा कायमस्वरूपी टिकून राहिल्यास गुन्ह्यांवर आपोआप नियंत्रण बसेल, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी अमळनेर येथे ढेकू रोडवरील पोलिस चौकी व सीसीटीव्ही यंत्रणा डीव्हीआर उद्घाटनप्रसंगी केले. यंत्रणेच्या प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे कार्यकारी संपादक रवी टाले, मुंदडा फाउंडेशनचे चेअरमन प्रकाश मुंदडा, डॉ. सुमित सूर्यवंशी, माजी नगरसेवक प्रताप साळी, बंडू जैन हजर होते. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे व पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव यांनी सीसीटीव्ही जाळे उभारून नियंत्रणासाठी विकेंद्रीकरण करून नवीन पोलिस चौक्या उभारल्या आहेत.
ढेकू रोडला नवीन चौकी उभारण्यात आली. यावेळी अपघातग्रस्तांना मदत करणारे सुनील हटकर व शेखर साळुंखे, दामिनी पथकातील नम्रता जरे यांचा सत्कार केला. बाळासाहेब भदाणे, पवन देशमुख यांच्या सहकार्याने पोलिस चौकी तर राजेंद्र अग्रवाल, प्रकाश मुंदडा, प्रताप साळी, विजय जैन, डॉ. सुमित सूर्यवंशी, सागर पाटील, उमेश साळुंखे यांच्या मदतीतून कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शहरातील पैलाड चौकी, गांधलीपुरा चौकी, झामी चौकी, बसस्थानक चौकींना भेट देऊन आढावा घेतला. सूत्रसंचालन व आभार पोलिस नाईक शरद पाटील यांनी मानले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक नरसिंग वा उपनिरीक्षक गंभीर शिंदे, प्रदीप शिरोडे, श्रद्धा इंगळे, रवी पाटील, दीपक माळी, संजय पाटील, योगेश पाटील, अशोक बिन्हाडे हजर होते.
