अमळनेर : विक्की जाधव
आपल्या दमदार कामगिरीने अमळनेरवासीयांचे अल्पावधीत मने जिंकून घेणाऱ्या पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची जळगावातील एमआयडीसी पोलीस स्थानकात बदली झाल्याने अमळनेरवासीय दुखावले होते. पण बदली हा प्रशासनाचा एक भाग असल्याचे त्यांनी पोनी हिरे यांना निरोप देण्यासाठी दि ३ डिसेंबर रोजी मोठ्या थाटात फुलांनी सजविलेल्या जीपमधून त्यांची मिरवणूक काढून निरोप दिला.
यावेळी अमळनेर शहरातील सर्व पक्षीय नेते मंडळी , सामाजिक कार्यकर्ते तर अमळनेर शहर पोलीस स्थानकाचे कर्मचारी यांनी भावूक होत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना निरोप दिला.
हिरेंच्या नावाने घाबरतात गुन्हेगार !
अमळनेर शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने नेहमी प्रमाणे अंकुश लावण्याचे काम नियमित सुरु असतांना सुद्धा छोटे मोठे गुन्हे होतच असल्याने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ज्या वेळेस अमळनेर पोलिसात दाखल झाल्यानंतर त्यांनी छोट्या मोठ्या गुन्हेगारापासून ते थेट गांजा पिकविणाऱ्यापर्यत जोरदार कामगिरी केल्याने अवैध धंदे करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणूण गेले होते. त्यामुळे अमळनेर शहरातील गुन्हेगारांना पोनि हिरे यांच्या नावाचीच दहशत बसली असल्याचे येथील सुद्य नागरिक सांगतात.
