धरणगाव : विनोद रोकडे
शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौक येथे शिवसेना व महाविकास आघाडी सामाजिक संघटनेचेवतीने प्रसाद लाडचा प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी त्याच्या तीव्र शब्दात निषेध केला. त्यानी महाराष्ट्र ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्याची भूमी म्हणून ओळखली जाते. परंतु भारतीय जनता पक्षाने जणू छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा खोटा सांगितले जात आहे. या आमदाराचा राजीनामा भाजपने घ्यावा असेही यावेळी वाघ बोलले.
तसेच या महाराष्ट्र तील भाजपचे नेते च नव्हे संविधानिक पद असलेले राज्यपाल ही बेताल वक्तव्य करत आहे हे आम्ही शिवप्रेमी सहन करणार नाही तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीचे देवरे यांनी सडकून टीका केली तसेच कॉग्रेसचे रतीलाल चौधरी, राष्ट्रवादीचे ता. अध्यक्ष धनराज माळी, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांनी निषेध व्यक्त केला.
,
यावेळी उपस्थित उपजिल्हा प्रमुख ऍड शरद माळी, राजेंद्र ठाकरे, शिवसेना शहराध्यक्ष भागवत चौधरी, धिरेंद्र पुरभे , नगरसेवक जितू धनगर, सुरेश महाजन, किरण मराठे, युवासेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील, मोहन पाटील, शहर अध्यक्ष संभाजी कंखरे, दीपक जाधव, गौरव चव्हाण, बापु महाजन, रवी जाधव, रामचंद्र महाजन,गणेश महाजन, सम्राट धनगर, राहुल रोकडे, जयेश महाजन, अमोल चौधरी, गजानन महाजन, किरण अग्निहोत्री सह महाविकास आघाडी चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते