जळगाव मिरर । ६ डिसेंबर २०२२
आपल्याला जगाशी नात जोडण्यासाठी सर्वच लोक स्मार्टफोनचा वापर करीत असतात व त्यामधील एक-एक अॅप उपलब्ध असते. Google Play Store वरून कोणतेही अॅप अगदी मोफत डाउनलोड करता येते. मात्र, बनावट अॅप्स डाउनलोड करणे तुम्हाला महागात पडू शकते. हे अॅप्स फोनमधील खासगी माहिती चोरू शकतात. वेळोवेळी अशा अॅप्सची माहिती समोर येत असते, त्यानंतर गुगलकडून या अॅप्सवर कारवाई करत प्ले स्टोरवरून हटवले जाते.
आता अशाच ३ अॅप्सची माहिती समोर आली आहे, जे तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकतात. या अॅप्समुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तुमच्या फोनमध्ये देखील हे अॅप्स असल्यास त्वरित डिलीट करा.
Synopsys सायबर सिक्योरिटी रिसर्च सेंटरने (CyRC) गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असलेल्या या ३ धोकादायक अॅप्सची माहिती दिली आहे. हे अॅप्स तुमच्या फोनचा अॅक्सेस स्कॅमर्सला देतात. तिन्ही अॅप्स रिमोट कीबोर्ड आणि माउसचे काम करतात. या अॅप्सचा वापर करून फोनचा माउस अथवा कीबोर्ड म्हणून सहजा वापर करता येते. यासाठी अॅप्स आणि पीसीला सर्व्हरशी कनेक्ट करावे लागते.
फोनमधील हे अॅप्स त्वरित करा डिलीट
तुमच्या फोनमध्ये Lazy Mouse, Telepad आणि PC Keyboard हे तीन अॅप्स असल्यास त्वरित डिलीट करा. अॅप्समुळे फोनमधील तुमची खासगी माहिती चोरी होऊ शकते व तुम्हाला आर्थिक फटका बसेल.
हे तिन्ही अॅप्स खूपच लोकप्रिय आहेत. आतापर्यंत २ मिलियनपेक्षा अधिक वेळा या अॅप्सला डाउनलोड करण्यात आले आहे. CyRC च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ऑथेंटिकेशन आणि ऑथोराइजेशनमध्ये त्रुटी असल्याने तुमच्या फोनचा अॅक्सेस इतरांना मिळतो.
दरम्यान, नवीन अॅप्स डाउनलोड करताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. अॅप डाउनलोड केल्यानंतर कोणकोणती परमिशन देत आहात, ते देखील तपासा. अॅप गरजेपेक्षा इतर परमिशन तर मागत नाहीये ना, हे नक्की पाहा. कोणत्याही अॅपला डाउनलोड करण्याआधी त्याचे रिव्ह्यू नक्की पाहा.