जळगाव मिरर / ७ डिसेंबर २०२२
औरंगाबादकडून नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या एसटी बसला नांदगाव पेठ येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे. आज सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून यामध्ये बसचालक गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने सदर बसमधील प्रवासी मात्र सुखरूप बचावले आहेत. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली असून नांदगाव पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली आणि जखमी चालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
बस थेट पुलावरील कठड्यावर अडकली आहे. याचे फोटो पाहूनच अंगावर काटा येत आहे. सुदैवाने या अपघता थोडक्यात टळला आहे. यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. मात्र, या अपघातामुळे बसमधील प्रवासी चांगलेच भयभीत झाले. अमरावती-नागपूर महामार्गावर हा अपघात झाला. गणेशपेठ डेपोची ही बस नांदगाव पेठ येथून एसटी बस नागपूरला जात होती. यावेळी हा विचित्र अपघात झाला.
नांदगाव पेठच्या उड्डाणपुलावरून बस खाली कोसळताना थोडक्यात बचावली आहे. पुलावरून बस कोसळता कोसळता वाचली आहे. ही बस पुलावर अडकल्याचे फोटोओत दिसत आहे. एसटी बस महामार्गावरील कठड्याला जोराने धडकली. यामुळे अर्धी बस रस्त्याच्या कडेला आणि अर्धी पुलाच्या खालच्या साईटवर अडकली होती. यात अनेक प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे. एसटी बसमधील काही प्रवासी जखमी. अपघाताची माहिती मिळताच वाहतुक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त बसला मदत केली. मागील अनेक दिवसांपासून राज्यात एसटी बसेसला होणाऱ्या अपघातांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसत आहे. वाहनचकांचा निष्काळजीपण आणि अती वेगाने बस चालवल्याने हे अपघात होत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.