जळगाव मिरर । ११ डिसेंबर २०२२
जिल्हा दूध संघ निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे खाते अरविंद देशमुख यांनी उघडल्यानंतर सहकार पॅनलचे खाते ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे यांच्या रूपाने उघडले आहे. तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर यांचा देखील विजयी झालेला आहे.
जिल्हा दुध संघ निवडणुकीत सहकार पॅनल व शेतकरी विकास पॅनल यांच्यात चांगली चुरस आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला शेतकरी विकास पॅनलचे एससी सवर्गातून आमदार संजय सावकारे विजयी झाले. एनटी संवर्गातून गिरीश महाजन यांचे गिरीश महाजन यांचे विश्वासू अरविंद देशमुख हे विजय झाले आहे. तर ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे यांची लढत शेतकरी विकास पॅनलच्या गोपाळ भंगाळे यांच्यासोबत होती. या लढतीत मोरे यांनी बाजी मारली आहे. ते माजी खासदार तथा माजी दुध संघ संचालक वसंतराव मोरे यांचे पुत्र आहेत. त्यांनी ३१ मतांनी विजय संपादन केला असून यामुळे सहकार पॅनलने खाते उघडले आहे.