जळगाव मिरर / १२ डिसेंबर २०२२
अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. ९ डिसेंबर रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये ही झटापट झाली असल्याची माहिती आहे. याशिवाय झटापटीत दोन्ही देशांचे मिळून जवळपास ३० पेक्षा अधिक सैनिक जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. तवांग जवळ ही झटापट झाली आहे. याबाबत भारतीय लष्कराकडून अधिकृतरित्या माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. या झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये कमांडरस्तरीय चर्चा झाली होती. यानंतर दोन्ही देशाचे सैनिक मागे हटले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये अरुणाचलमधील यांगसेमध्येही दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद उफाळला होता. तवांग जिल्ह्यातील यंगस्तेमध्ये ही झटपाट झाली. प्राप्त माहितीनुसार चीन पीपुल्स लिब्रेशन आर्मी एलएसी पर्यंत पोहचली होती. त्यांनतर भारती जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. ही घटना 9 डिसेंबर रोजी घडली आहे. तवांग सेक्टरमध्ये झालेल्या या चकमकीत दोन्ही बाजूचे काही सैनिक किरकोळ जखमी झाले. यानंतर दोन्ही देशाच्या सैनिकांनी तेथून माघार घेतली आहे. दोन्ही देशातील सैन्याच्या कमांडर स्तरावर चर्चा झाल्यानंतर हे प्रकरण मिटविण्यात आले. या भागात दोन्ही लष्कर काही भागांवर आपापल्या परीने दावा करत आहेत. हा वाद 2006 पासून सुरू आहे. याआधी 15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशाच्या सैन्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते, तर 38 चिनी सैनिक मारले गेले होते. चीनने 4 सैनिक मारले गेल्याचे सत्य मान्य केले होते.
Indian troops in area of face-off in Tawang gave befitting response to Chinese troops.Number of Chinese soldiers injured is more than that of Indian soldiers.Chinese had come heavily prepared with around 300 soldiers but didn't expect Indian side also to be well prepared: Sources pic.twitter.com/hKVVIQlSp4
— ANI (@ANI) December 12, 2022
गेल्या वर्षी याच भागात 200 चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. तेव्हाही भारतीय जवानांनी तो हाणून पाडला होता. त्यानंतर गस्तीदरम्यान दोन्ही देशांचे सैनिक सीमेवरील वादावरून आमनेसामने आले. काही तास हा प्रकार चालला. मात्र, यामध्ये भारतीय जवानांना कोणतीही हानी झाली नाही. प्रोटोकॉलनुसार हा वाद वाटाघाटीने मिटवण्यात आला. चीनच्या योजनांना कायमस्वरूपी मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार 40 हजार कोटी रुपये खर्चून ईशान्येत फ्रंटियर हायवे बांधणार आहे. सुमारे 2 हजार किलोमीटर लांबीचा हा महामार्ग अरुणाचल प्रदेशची जीवनरेखा आणि चीनसमोर भारताची कायमस्वरूपी ग्राउंड पोझिशन लाइनही ठरेल. सामरिक महत्त्वाबद्दल बोलायचे झाल्यास ती मॅकमोहन रेषा, भारत आणि तिबेट दरम्यान आखलेली सीमारेषा पार करेल. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव हेन्री मॅकमोहन यांनी ही सीमा म्हणून मांडली होती आणि भारत ती खरी सीमा मानतो तर चीनने ती नाकारली आहे. या महामार्गाचे बांधकाम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाणार आहे. लष्कर लॉजिस्टिक सपोर्ट देईल. तवांगनंतर पूर्व कामेंग, पश्चिम सियांग, देसाली, डोंग आणि हवाई यानंतर फ्रंटियर हायवे म्यानमारला जाईल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. नाव बदलल्याने सत्य बदलत नाही. 2017 मध्येही चीनने असेच पाऊल उचलले होते. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि राहील. 3488 किलोमीटर लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे. मात्र, चीन अरुणाचल प्रदेशचा भागही वादग्रस्त मानतो. अरुणाचल प्रदेशची चीनशी 1126 किमी लांबीची सीमा आणि चीनशी 520 किमी लांबीची सीमा आहे. अरुणाचल हा पारंपारिकपणे दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे, तर भारत अक्साई चीन प्रदेशावर आपला दावा करतो.