जळगाव मिरर । २३ डिसेंबर २०२२
शहरात तीन दिवसीय सुप्रसिद्ध मधुमेह संशोधक व राष्ट्रपती पुरस्कार विजेते रविंद्र नांदेडकर प्रणित मधुमेह मुक्त भारत अभियाना अंतर्गत तथा शिवालय स्पाईन & न्यूरो याच्या संयुक्त विद्यमानाने जळगांव शहरात हरी विठ्ठल नगर येथे मोफत मधुमेह आणि रक्तदाब तपासणी शिबिर . सकाळी ९:३० ते ०३:३० ह्या वेळेत संपन्न झाले. या शिबीराचा स्थानिक नागरिकांनी लाभ घेतला.
या वेळी अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे दुर्गेश निंबाळकर जळगांव यांनी उचीत आहार उचीत उपचाराने मधुमेह कश्या प्रकारे कमी होऊ शकतो. या बद्दल मार्गदर्शन केले. जळगाव शहरातील या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. श्री.दुर्गेश निंबाळकर जळगांव यांनी अनुयश आरोग्य प्रतिष्ठान समन्वयक म्हणून संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
