जळगांव: प्रतिनिधी
पहाटेच्या मंगल वातावरणात सुवासिनींनी केलेले गुढीपूजन व त्याचसोबत मान्यवरांनी उगवत्या सूर्याला दिलेले अर्ध्य व मंचाववरून साधकांनी सुरेल सादर केलेली लता मंगेशकरांची गाजलेली गीते अशा प्रसन्न मुहुर्तावर संस्कारभारतीची गुढीपाडवा पहाट साजरी झाली. म.न.पा. प्रांगणातील कार्यक्रमाची सुरुवात ‘ओम नमोजी आदया या संत ज्ञानेश्वरांच्या रचनेने झाली तर जयोस्तुते श्री महन्मंगले” या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रचनेने कार्यक्रमाचा समारोप झाला. भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांची गाजलेली गीते हे या कार्यक्रमाचे आकर्षण होते. कार्यक्रमात सामील असलेले कलासाधक संपदा छापेकर, स्वाती डहाळे, अथर्व मुंडले, निळकंठ कासार, दिलीप चौधरी (तबला), राजेंद्र माने (संवादिनी), गिरीष भोघे (तबला) यांनी सुरेल गीते सादर केली अभ्यासपूर्ण निवेदन वैदेही नाखरे यांनी केले कथक कला मंदीरच्या रमा करजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कारभारती गीत, आज गोकुळात रंग या गीतांवर रसिका ढेपे, निधी गायकवाड, विप्रा तळेले, सानिका शेठ, मिताली सपकाळे, स्तुती (शेर्मा, समृध्दी ब्राम्हणे, देवश्री पाटील, कुंतल वाघमारे, अनुष्का पोतदार, युक्ता नाईक, श्रावणी बावसकर यांनी सामुहीक नृत्य केले.
गुढीपूजन प्रसंगीच्या सुवासिनी- जयश्रीताई महाजन (महापौर), मायाताई धुप्पड (जेष्ठ साहीत्यीका’), गीता रावतोळ, रेखाताई लढे, सुनंदा सुर्वे, कल्पना नेवे, रमा करजगांवकर. अर्घ्यदान करणारे मान्यवर कुलभूषण पाटील (उपमहापौर ), अनील अभ्यंकर, मोहन रावतोळे, डॉ. सुभाष महाले, डॉ, पुरुषोत्तम पाटील, चिंतामणू पाटील, सुहास देशपांडे, किशोर सुर्वे, प्रमोद जोशी, दुश्यंत जोशी, अध्ये मंत्र – संयुक्ता बयाणी गीते व गायक ओम नमोजी आदया, मोगरा फुलला, विठठल तो आला ,जिवनात ही घडी, वारा गाई गाणे (संपदा छापेकर) जेथे जातो तेथे, अरे अरे ज्ञाना (स्वाती डहाळे) गगन सदन भय इथले संपत नाही अथर्व मुंडले, रुणुझुणु रे भ्रमरा (निळकंठ कासार) मी डोलकर दर्याचा राजा (दिलीप चौधरी), संधीकाली या अशा (राजेंद्र माने), ने मजसी ने, जयोस्तुते, गुढी गीत (समुहग्रान)आदी कार्यक्रम उत्साहात झाले.
