जळगाव मिरर । २९ डिसेंबर २०२२
देशात गेल्या काही महिन्यापासून शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरनं हा वाद पेटून उठला होता. दीपिका पदूकोणच्या या भगव्या बिकिनीवरनं मोठं राजकारण घडलेलं आपण सगळ्यांनीच पाहिलं. सिनेमावर बंदी आणण्याची देखील मागणी केली गेली. आता सेन्सॉर बोर्डानं काही बदल सूचवत मेकर्सला यातून सुवर्णमध्ये शोधून काढण्याचे आदेश दिलेत.
सेन्सॉर बोर्डाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार,पठाण सिनेमाची टीम काही दिवसांपूर्वीच सर्टीफिकेट मिळवण्यासाठी एक्झामिनेशन कमिटीकडे गेली होती. CBFC च्या गाइड लाइन्सनुसार सिनेमाचं अगदी बारकाईनं निरिक्षण केलं गेलं. कमिटीनं मेकर्सला सिनेमात काही बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे बदल सिनेमातील गाण्याविषयी आहेत. कमिटीनं ‘पठाण’ सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होण्याआधी त्याच्या रिवाइज्ड व्हर्जनला सबमिट करायचे आदेश दिले आहेत.
म्हणजेच आता मेकर्सला गाण्याच्या एडिटिंगवर पुन्हा मेहनत घ्यावी लागणार आहे. CBFC च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंसॉर बोर्ड नेहमीच क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स आणि लोकांच्या संवेदनक्षमते दरम्यान ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करताना दिसते. तेव्हा यावर सगळेच सुवर्णमध्य शोधून काढतील अशी अशा ठेवायला हरकत नाही.मेकर्सला आता लक्ष द्यावं लागेल की आपण जे काही मांडतोय त्या विषयापासनं भरकटता कामा नये. नव्यानं मांडताना पुन्हा कोणतीही चूक होऊ नये. सत्य आणि वास्तव यापासनं आपण भरकटणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. शेवटी क्रिएटर्स आणि प्रेक्षक यांच्यातील विश्वास टिकवून ठेवायचा आहे. त्यामुळे गाणं पन्हा एडिट करताना क्रिएटर्सला सांगितलेल्या गोष्टींवर नीट लक्षपूर्वक काम करावं लागेल.
आता सेन्सॉर बोर्डानं पठाणच्या मेकर्सला सिनेमात नेमके काय बदल करायला सांगितलेत याचा खुलासा सिनेमा रिलीज झाल्यावर होईल. दीपिकाच्या भगव्या बिकिनी चा रंग बदलणार का की सीन्स एडिट होणार की अख्खं गाणंच बदललेलं दिसणार? हे प्रश्न सध्या मनात आहेत. याआधी कधी कपड्यांमुळे सिनेमात बदल करायला लागलेयत ही घटना घडलेलीच नाही. दीपिका-शाहरुखचे बेशरम रंग गाणं वादात पडलं असलं तरी…गाण्यानं चार्टबस्टरमध्ये टॉपचा नंबर पटकावला आहे. दोन आठवड्यातच गाण्याला १५० मिलियन्स व्ह्यूज मिळालेत. आतादेखील बेशरम रंग गाणं ट्रेन्डिंगला आहे. या गाण्याला वादाचा फायदा मात्र भरपूर झाला. ‘पठाण’ सिनेमातील दूसरं गाणं ‘जियो पठाण’ देखील जबरदस्त हिट ठरलं.
