जळगाव मिरर / २ जानेवारी २०२३
अतरंगी आणि बोल्ड फॅशनमुळे सोशल मीडियावर उर्फी जावेद कायम चर्चेत असते. अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसापासून भाजप नेत्या चित्रा वाघ व तिच्यामध्ये सोशल मीडियावर मोठे वाक् युद्ध रंगले होते. त्याचेच पडसाद पुण्यात उमटले आहे. पण यावेळी तिच्या विरोधात तक्रार मात्र दुसऱ्याच पक्षाच्या महिला नेत्यांनी दिली आहे.
अभिनेत्री उर्फी जावेद विरोधामध्ये पुण्यात तक्रार देण्यात आली आहे. उर्फीच्या कपड्यांवरुन तिला बोल लावले जात आहेत. पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात उर्फीविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अर्चिता जोशी यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात उर्फी जावेद हिच्यावर सायबर अंतर्गत गुन्हा दखल करण्याची मागणी केलीय. एकीकडे निष्पाप महिला विकृतांच्या शिकार होतायत. तर ही बया अजून विकृती पसरवतीये, असं ट्वीट भाजप महिला आघाडी अध्यक्ष चित्रा वाघ यांनी शेअर केलं होतं. यानंतर आता रिपाई कडून तिच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
