जळगाव मिरर । ५ जानेवारी २०२३
हिवाळ्यात नेहमीच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय नेहमी करीत असतो तर काही उपाय असे असतात की त्यामधून काही प्रमाणात फरक पडतो मात्र तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला हा घ्यावाच लागतो. तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी व नागरिकांचे प्रत्येकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी जळगाव शहरातील एका डॉक्टरांनी केलेल्या नवीन वर्षाच्या संकल्पनेत संपूर्ण आरोग्य तपासणी हा एक महिन्याचा शिबिर जळगावत घेण्यात येत आहे.
शहरातील प्रसिद्ध मधुदत्त मॅटनिटी आणि नर्सिंग होम या ठिकाणी जळगावसह ग्रामीण भागातील नागरिकांचे संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर एक महिन्याचे होत आहे. या ठिकाणी शंभर प्रकारच्या रक्तातल्या व लघवीतल्या टेस्ट करू शकतात. या ठिकाणी आरोग्याची तपासणी एमडी मेडिसिन डॉ. तेजस दिलीप राणे, तसेच 38 वर्षापासून जळगाव शहरात अविरत सेवा देणारे डॉ.दिलीप दत्तात्रय राणे तर डॉ.श्रद्धा तेजस राणे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. या शिबिराचे ठिकाण 47 मानश्री सरस्वती नगर नेरी नाका जवळ जळगाव याठिकाणी होत आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.