जामनेर : प्रतिनिधी
शहरातील आनंदयात्री परिवाराच्या माध्यमातून गुढीपाडवा, मराठी नववर्षानिमित्त ‘पाडवा पहाट’ या शास्त्रीय व सुगम संगीताची मैफिल जयपूर घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय व उपशास्त्रीय गायक पं.सचिन भावसार,पुणे व गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या शिष्या सौ.सुनीता टिकारे, मुंबई यांच्या भाव-भक्ती गीतांच्या शास्त्रीय गायनाचे आयोजन जळगाव रोड येथील सोनेश्वर महादेव मंदिर सोनबर्डी ॲम्फी थिएटर येथे जामनेरकरां साठी करण्यात आले होते. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून माजी मंत्री आ गिरीश महाजन तसेच जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते गुढी उभारून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जामनेर चे तहसीलदार अरुण शेवाळे, नगरपालिका मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांची उपस्थिती होती. मैफिलीला वाद्यवृंद तबला- तेजस मराठे, हार्मोनियम -जितेश मराठे, पखवाज- भूषण गुरव, ताल -उमेश चौधरी ,तानपुरा -कुंदन तायडे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश राऊत यांनी तर आभार डॉ.चंद्रशेखर पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंदयात्रीचे अध्यक्ष डॉ अमोल सेठ,सचिव सुहास चौधरी, कोषाध्यक्ष डॉ आशिष महाजन,डॉ राजेश सोनवणे,डॉ पराग पाटील,नितीन पाटील,सुधीर साठे,कडू माळी, अमरीश चौधरी,बंडू जोशी,सनी डांगी यांनी परिश्रम घेतले.
