जळगाव मिरर । २७ जानेवारी २०२३ ।
देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात नोकर भरती काही काळानंतर निघालेली असतांना युवक तयारीला लागलेले आहे. यातच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयात शिक्षकांच्या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी इग्नूच्या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर भेट द्यावी. या पदांवर अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
याशिवाय उमेद्वार या पदांसाठी http://www.ignou.ac.in/ या लिंकवर क्लिक करून पण अर्ज भरू शकताता. यासोबतच या लिंकवर इग्नु रिक्रुटमेंट२०२३ नोटीफिकेशन पीडीएफ च्या माध्यमातून ऑफिशीयल नोटीफिकेशन चेक करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ६० पद भरण्यात येणार आहेत.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख
३० जानेवारी पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील.
एकूण पद
६० जागांसाठी ही भरती आहे.
शैक्षणिक पात्रता
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्र
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे,
अनुभव पत्र
अर्जाची हार्ड कॉपी
शैक्षणिक, समन्वय प्रभाग, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय, मैदान गढी, नवी दिल्ली ११००६८ या पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे. स्पीड पोस्ट १० फेब्रुवारी २०२३ च्या आधी संस्थेला मिळणे आवश्यक आहे.