जळगाव मिरर । २ फेब्रुवारी २०२३।
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागून असतानाच आज पहाटेच सत्यजित तांबे यांनी एक ट्विट व्हायरल केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यात तगडी लढत दिसून येत असतांना निकालापूर्वीच सत्यजीत तांबेंना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जवळच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे. pic.twitter.com/R7Qfcv5aRr
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 2, 2023
माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे. अशा आशयाचे ट्विट तांबे यांनी केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मानस पगार आणि त्यांच्यासोबत काही सहकारी नाशिक येथे जात असताना हा अपघात झाला. नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर लोकांवर उपचार सुरु आहेत.
मानस पगार हे काँग्रेस पक्षाचे नाशिकचे युवक जिल्हाध्यक्ष होते. काँग्रेसमध्ये येण्याच्या आधीपासून पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारांसाठी त्यांनी काम सुरु केले होते. युथ फॉर डेमोक्रसी या संघटनेच्या माध्यमातून सेक्यूलर विचारांना अधिक युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते आणि त्यांचे सहकारी कार्यरत होते.
भाजपाकडून करणाऱ्या येणाऱ्या आरोपांना, दाव्यांना पुराव्यासहीत खोडून टाकण्याचे प्रसंगी प्रतिवाद करण्याची भूमिका मानस घेत असत. त्यांच्या लिखाणामुळे अनेक तरुण काँग्रेससोबत जोडले गेले होते.