जळगाव मिरर / ११ फेब्रुवारी २०२३ ।
राज्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्यासोबत अल्पवयीन मुलीसह महिला या गुन्हेगारीत शिकार होताना अनेक प्रकरणात दिसत आहे. अमरावती जिल्ह्यातून संतापजनक बातमी समोर आली आहे. भाऊ- बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.
चुलत भावानेच आपल्या बहिणीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चुलत भावाने अत्याचार केल्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. बहीण – भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपी १९ वर्षीय चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी पीडित मुलगी आणि तिच्या चुलत भावाची भेट झाली. यावेळी चुलत भावाने तू माझी बहीण आहेस, हे मला माहित आहे. पण तरीही तू मला खूप आवडतेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे तिला म्हटले. मात्र पीडित मुलीने याला नकार दिला. यानंतर दोघांमध्ये मोबाइलवर चॅटिंग सुरु झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यादरम्यान चार महिन्यांपूर्वी चुलत भावाने तिला तू मला खूप आवडतेस, असे म्हणून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. या सगळ्याला पीडितेने नकार देताच त्याने तिला धमकी दिली. यानंतर आरोपी चुलत भावाने तिचे लैंगिक शोषण केले. सलग 8 दिवस त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुटुंबातील लोकांना समजले तर ते आपल्याला मारतील या भीतीने ती कुटुंबातील कोणालाच याबद्दल सांगितले नाही. यादरम्यान 6 फेब्रुवारी रोजी शाळेतून परत येत असताना स्वतःत काही शारीरिक बदल जाणवल्याने तिने याबाबत आपल्या मैत्रिणीला सांगितले. त्यानंतर ती मैत्रिणीच्या सल्ल्याने तपासणीसाठी एका रुग्णालयात गेली. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला तपासून ती 3 महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.
यानंतर तिने याबाबत आपल्याला आईला आणि आजीला सांगितले. त्यानंतर आईसह पुन्हा रुग्णालयात जावून तिने तपासणी केली. त्यावेळीही ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. यानंतर पीडित मुलीने आपल्या आईसह कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला. कोतवाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
