जळगाव मिरर / २२ फेब्रुवारी २०२३
आपल्या वेगळ्या शैलीतल्या अभिनयासाठी, नृत्यासाठी ओळखला जाणारा अक्षय कुमार हा गेल्या चार ते पाच दशकापासून अक्षय कुमार या अभिनेत्याची सगळीकडेच हवा आहे. रोमॅण्टिक चित्रपटांपासून ते कॉमेडी चित्रपटांपर्यंत अक्षयनं आपल्या अभिनयानं सर्वांचीच मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे अक्षय कुमार हा आपल्या एनर्जासाठीही ओळखला जातो. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा हा अभिनेता आपल्या सामाजिक बांधिलकीतूनही अनेक तऱ्हेने समाजिक कार्यही करताना दिसतो त्यामुळे अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. आता अक्षय कुमार हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारणं मात्र फार खास आहे. पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी हे पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.
‘सेल्फी’ हा त्यांचा आगामी चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचे प्रमोशन हे सगळीकडेच जोरदार सुरू आहे. त्यामुळे अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांना एकत्र चित्रपटातून पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरली आहे. याच चित्रपटाच्या पार्श्वभुमीवर अक्षय कुमारनं रेकॉर्ड ब्रेक काम केले आहे. सेल्फीच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी हे ठिकठिकाणी फिरत आहेत. त्यासाठी सध्या त्यांनी अशाच एक प्रमोशनल इव्हेंटला भेट दिली होती. त्या दरम्यान अक्षय कुमारनं सेल्फी काढत रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
अक्षय कुमारनं यावेळी 3 मिनिटात 184 सेल्फी काढत रेकॉर्ड ब्रेक केला आहे. अक्षय कुमारला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खिलाडी म्हणून ओळखले जाते. त्याचा ‘सेल्फी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्याच्या या रेकॉर्ड ब्रेक कामगिरीमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी अभिनेता जेम्स स्मिथनं 22 जानेवारी 2018 रोजी 168 सेल्फीज काढून रेकॉर्ड ब्रेक केला होता. त्यापुर्वी 2015 साली 105 सेल्फीज काढून अभिनेता ड्वायन जॉन्सनने रेकॉर्ड मोडला होता. माझ्या चाहत्यांसोबत मला हा रेकॉर्ड शेअर करताना खरंच खूप आनंद होतो आहे. माझ्या चाहत्यांनी माझ्यावर कौतुकाचा आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे त्यामुळे आज मी जो आहे तो फक्त त्यांच्यामुळे. त्यामुळे एकप्रकारे हा रेकॉर्ड मोडणं म्हणजे माझ्या चाहत्यांसाठी एक मानवंदना असेल. माझ्या संपुर्ण करिअरमध्ये ते कायमच माझ्यासाठी उभे राहिले आहेत, अशी भावनाही यावेळी अक्षय कुमारनं व्यक्त केली. सेल्फी हा चित्रपट मल्ल्याळम चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ या चित्रपटाचा रिमेक आहे. 24 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील कुडी चमकिली हे गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच या चित्रपटाची चर्चा आहे.
