जळगाव मिरर / २७ फेब्रुवारी २०२३ ।
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या जोरदार सोशल मिडीयावरील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहे. तिच्या मोहक हास्यावर सगळेच फिदा होतात. चित्रपटांमध्ये नाव कमावणाऱ्या प्रार्थनाने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून छोट्या पडदाही चांगलाच गाजवला.
या मालिकेत प्रार्थनाने साकारलेली नेहा कामात महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली. या मालिकेमुळे प्रार्थनाचं फॅन फॉलोईंग जबरदस्त वाढलं. प्रार्थना सोशल मीडियावर सुद्धा चांगलीच चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसतात. नुकतीच प्रार्थनाने एक पोस्ट केलीय जी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. प्रार्थना बेहेरेचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. एक नाही दोन नाही तर तब्बल 15 वर्षांनंतर प्रार्थनाची ही इच्छा पूर्ण झाली आहे. प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. प्रार्थना अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगणा देखील आहे. प्रार्थना उत्तम डान्स करते. तिला अनेकदा डान्स करण्याची संधी मिळते. पण नुकतंच तिने शास्त्रीय नृत्यप्रकार सादर केला.
प्रार्थनाने याबाबत नुकतीच एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने याविषयीस सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये प्रार्थना तिच्या भरतनाट्यम नृत्याच्या सादरीकरणापूर्वी तयारी करताना दिसत आहे. हा नृत्यप्रकार सादर करताना ती फारच आनंदी दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्रार्थनाने पायात घुंगरू बांधलेला फोटो शेअर करत ‘खूप वर्षानंतर’ असं लिहिलं होतं. तेव्हापासूनच तिच्या चाहत्यांना ती नक्की काय करणार याबाबत उत्सुकता होती. आता अखेर प्रार्थनाने डान्सचा व्हिडीओ पोस्ट करत गुपित उघडलं आहे.




















