जळगाव मिरर / ६ मार्च २०२३ ।
गेल्या आठवड्याभरापूर्वी बागेश्वर धाम सरकार अडचणीत आले होते. पंडित धीरेंद्र शास्त्रींच्या भावाला अटक करण्यात आलेली असतांना देशभर चर्चेला उधान आले होते. पण आता सध्या सोशल मीडियावर बागेश्वर धामचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक नववधू पंडित धीरेंद्र शास्त्रींना आपल्या मनातील गोष्ट सांगते. हे ऐकून धीरेंद्र शास्त्रींचे डोळे पाणवले. बागेश्वर धामचा हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी बागेश्वर धाममध्ये अनेक जोडप्यांचे लग्न झाले होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की बागेश्वर धाममध्ये काही जोडप्यांचे लग्न होत आहे, त्यापैकी एक नववधू बागेश्वर महाराजांना तिला काय हवे आहे ते सांगत आहे. वधूने सांगितले की, “माझे वडील या जगात नसल्याने बागेश्वर महाराजांनी मला खूप मदत केली आहे.” त्याचवेळी हे ऐकून धीरेंद्र शास्त्री यांचे डोळे पाणावले.
