जळगाव मिरर / ६ मार्च २०२३
नेहमीच आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद अनेक वादात देखील अडकत असते पण त्यावादातून सुरक्षितरित्या सुटत पुन्हा चर्चेत येण्यासाठी तिला कधीही नवीन कारण लागत नाही. उर्फीने आता ‘एसयूवी’ ही नवीन कार खरेदी केली आहे. उर्फीने खरेदी केलेल्या नव्या कारची किंमत 31.29 लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे. कार खरेदी करतानाचा उर्फीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उर्फीने नवीन कार खरेदी करत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उर्फीने नवीन कार स्वत:साठी नाही तर तिच्याकडे काम करणाऱ्या तिच्या स्टाफसाठी घेतली आहे. कार खरेदी केल्यानंतर एका मुलाखतीत उर्फी म्हणाली,”एसयूवी’ ही माझी दुसरी कार आहे. माझ्यासाठी काम करणाऱ्या माझ्या स्टाफला रिक्षामधून शूटिंगच्या ठिकाणी यावं लागत होतं. त्यामुळे आता माझा मॅनेजर, मेकअप आर्टिस्ट, बाउन्सर आणि टीममधील इतर सदस्य या कारने शूटिंगला येतील”.
उर्फी जावेदचा कार खरेदी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहते कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ट्रेंडी आणि युनिक आउटफिट्समुळे चर्चेत असणारी उर्फी तिच्याकडे काम करणाऱ्या मंडळींचा खूप विचार करते हे तिच्या कृतीने सिद्ध झालं आहे. आलिशान कार खरेदी केल्यानंतर उर्फीने केक कापत आनंद सादरा केला आहे.
