जळगाव मिरर / २३ मार्च २०२३ ।
देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज सुरत कोर्टात खटल्याचा निकाल होता, तो निकाल नुकताच लागला असून राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का’ या विधानाशी संबंधित मानहानीच्या खटल्यात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवले आहे. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला सुरू होता. तत्पूर्वी, 17 मार्च रोजी या प्रकरणातील सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. निकालाच्या वेळी राहुल कोर्टात हजर होते. राहुल गांधी सकाळी दिल्लीहून सुरतला पोहोचले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी 150 जवान तैनात करण्यात आले आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल यांनी आपल्या भाषणात चोरांचे आडनाव मोदी असल्याचे म्हटले होते. सर्व चोरांना मोदी हे आडनाव का असते, मग तो ललित मोदी असो की नीरव मोदी असो की नरेंद्र मोदी. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी तीन वेळा न्यायालयात हजर झाले. ऑक्टोबर 2021 च्या शेवटच्या हजेरीदरम्यान, त्याने स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले.
राहुल गांधींनी आमच्या समाजाला चोर म्हंटले आहे, अशी तक्रार दाखल करणारे आमदार पूर्णेश मोदी यांनी केली. निवडणूक सभेत आमच्या आणि समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आमच्यावर करण्यात आला. त्यामुळेच आम्ही हे प्रकरण न्यायालयात आणले. शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहोत. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. दरम्यान, राहुल गांधीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, पूर्णेश मोदी या प्रकरणात पीडित पक्षकार म्हणून तक्रारदार असूच शकत नाहीत. कारण राहुल गांधींच्या बहुतेक भाषणांमध्ये पूर्णेश मोदी नव्हे तर पंतप्रधानांना लक्ष्य केले गेले होते.