• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात उद्यापासून श्री.सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवास प्रारंभ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 31, 2023
in जळगाव, सामाजिक
0
जळगावात उद्यापासून श्री.सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवास प्रारंभ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ३१ मार्च २०२३

सकल जैन श्री संघ, जळगाव च्या श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती-२०२३ तर्फे शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांचा २६२२ वा जन्मकल्याणक महोत्सव जळगाव मध्ये उद्यापासून दि. १ ते ५ एप्रिल दरम्यान साजरा होणार आहे. यामध्ये विविध सांस्कृतिक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अहिंसा परमो धर्म नुसार प्रत्येकाला जिओ और जिने दो या थीमवर हा महोत्सव सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा होईल.

वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दि. १ एप्रिला ला सकाळी ट्रेझर हंट प्रतियोगिता खान्देश सेंट्रल मॉलला होईल. शुद्ध नवकार मंत्र लेखन स्पर्धा के डी. वी. ओ. जैन महाजन वाडी नवी पेठ येथे होईल. यानंतर ध्वज बनाओ- सजाओ ही स्पर्धा वीतराग भवन लाल मंदिर येथे होईल. तर जैन आगम ही वक्तृत्व स्पर्धा आर. सी. बाफना स्वाध्याय भवन येथे होईल.

विश्व शांतीसाठी अहिंसा दौड

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. २ एप्रिल ला विश्व शांतीसाठी अहिंसा दौड काढण्यात येणार आहे. हजारो समाज बांधवांसह जळगावकर या दौडमध्ये सहभागी होतील. खान्देश सेंट्रल ते नवजीवन सुपर शॉप बहिणाबाई उद्यान पर्यंत ही दौड असेल. यानंतर मोबाईव जलसेवेचे लोकार्पण केले जाईल. आर.सी.बाफना स्वाध्याय भवन येथे भगवान महावीर यांचे ३४ अतिशय या विषयावर लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. कोठारी मंगल कार्यालयाला कार्निवल तर बालगंधर्व नाट्यगृहाला धार्मिक नाटीकेची प्रस्तूती केली जाणार आहे.

रांगोळी स्पर्धेसह मोटार सायकल रॅली

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दि. ३ एप्रिल ला आवश्यकता असणाऱ्यांना फळांचे वाटप जिल्हा रूग्णालयामध्ये केले जाईल. स्वाध्याय भवनला सामुहिक सामायिक होईल. त्यानंतर खान्देश सेंट्रल मॉल ते भाऊंचे उद्यान दरम्याण मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. भगवान महावीर जीवन दर्शन वर आधारीत रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. विजेत्यांचा पुरस्काराने बालगंधर्व नाट्यगृह येथे गौरविण्यात येईल. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिक श्रोत्यांना अनुभवता येणार आहे.

पशु रूग्णवाहिकेचे लोकार्पण, रक्तदान शिबीर

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्य चौथ्या दिवशी दि. ४ एप्रिल ला जैन ध्वज वंदन श्री. वासुपुज्यजी जैन मंदीर याठिकाणी होईल. येथूनच भव्य शोभा यात्रा-वरघोडा मिरवणूक काढण्यात येईल. रक्तदान शिबीरासह आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन बागंधर्व नाट्यगृह याठिकाणी करण्यात आले आहे. अधोरेखित करण्यासारखे म्हणजे पशू रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येईल. मुख्य समारंभा प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बीजेएस चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य श्री. संजयजी सिंघी मार्गदर्शन करणार असून ‘बदलते सामाजीक परिवेश में महावीर वचनों की प्रासंगीकता’ या विषयावर ते आपले विचार मांडतील. याप्रसंगी समारंभाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री श्री. सुरेशदादा जैन असतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संघपती श्री. दलिचंदजी जैन, माजी खासदार श्री. ईश्वरलाल ललवाणी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, उद्योजिका श्रीमती नयनताराजी बाफना, माजी महापौर श्री. रमेशदादा जैन, माजी महापौर श्री. प्रदीप रायसोनी, गोसेवक श्री. अजय ललवाणी, गौतम प्रसादी लाभार्थी श्री. महेंद्र रायसोनी उपस्थीत असतील. मॉडर्न स्कूलच्या प्रांगणात सामुहिक नवकारसी चे लाभार्थी स्व. सदाबाईजी ग्यानचंदजी रायसोनी परिवार द्वारा श्री. महेंद्र रायसोनी हे असतील. यानंतर भगवान महावीर झुला उत्सव साजरा होईल.

प.पू. आचार्च श्री रामलालजी म.सा. जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांचे आयोजन

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी दि. ५ एप्रिल ला प.पू. १००८ आचार्य श्री. रामलालजी म.सा. यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. जिल्हा रूग्णालयामध्ये फळ वाटप होईल. यासह आर.सी.बाफना स्वाध्याय भवन येथे गुणानुवाद सभा होईल यात सुसानिध्य शासनदिपक प.पू. सुबाहुमुनीजी म.सा., प.पू. भुतीप्रज्ञजी म.सा. उपस्थित असतील. नवकार महामंत्र जाप ने महोत्सवाची सांगता होईल.

दरम्यान संपूर्ण महोत्सवादरम्यान जैन इरिगेशन सिस्टीम्स व भवरलाल ऍण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे भाग्यवर्धन पार्श्वनाथ मंदिर परिसरात भगवान महावीर यांच्या प्रतिमांची विशेष सजावट केली जाणार आहे. स्वाध्याय मंडलद्वारा निबंध स्पर्धा, जे.पी.पी. जैन महिला फाऊंडेशनद्वारा चित्रकला स्पर्धा, श्रद्धा मंडळाद्वारा कविता बनाओ स्पर्धा, सदाग्यान भक्ती मंडळद्वारा स्वरचित भजन, गायन व्हिडीओ प्रस्तूती, भारतीय जैन महिला संघटनेतर्फे भजन स्पर्धा, जैन सोशल ग्रृपतर्फे फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेतली जाणार आहे.

अहिंसेचा संदेश देण्यासह जगा आणि जगू द्या ही शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांचे विचार प्रत्येक माणसाच्या मनात रूजावे त्यानुसार मन:शांतीतून चांगला समाज घडावा यासाठी सर्व श्री सकल जैन संघासह जळगावकरांनी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात सहभागी व्हावे. असे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये श्री. सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती २०२३ चे अध्यक्ष विनोद ठोळे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेवेळी श्रीमती नयनतारा बाफना, राजेश जैन, ललित लोढीया, महेंद्र रायसोनी, दिलीप गांधी, स्वरूप लुंकड हे उपस्थित होते.
प्रसिद्धी समितीचे प्रविण छाजेड (9422275623) यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Related Posts

शॉर्टसर्किटची भीषण घटना; रिक्षा जळाली, चालक अडचणीत
क्राईम

शॉर्टसर्किटची भीषण घटना; रिक्षा जळाली, चालक अडचणीत

July 30, 2025
नारीशक्तीने दिला गरजूंना शिक्षणासाठी आधार; ३२ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप !
जळगाव

नारीशक्तीने दिला गरजूंना शिक्षणासाठी आधार; ३२ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप !

July 30, 2025
सभागृहात २२ मिनिटे रमी खेळ? रोहित पवारांचा सरकारला सवाल
क्राईम

सभागृहात २२ मिनिटे रमी खेळ? रोहित पवारांचा सरकारला सवाल

July 30, 2025
जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या
क्राईम

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या

July 30, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उंदीर मारण्याचे औषध घेतल्याने ६० वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्देवी मृत्यू !

July 30, 2025
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव दोन दुचाकीची समोरा-समोर जबर धडक : एका ठार तर एक जखमी !

July 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेव्ह पार्टी प्रकरण वादात; ५० कोटींचा मानहानी दावा दाखल करणार !

रेव्ह पार्टी प्रकरण वादात; ५० कोटींचा मानहानी दावा दाखल करणार !

July 30, 2025
निसर्ग पाहायला आले, मृत्यूला दिलं आलिंगन ; खान्देशातील तरुण-तरुणीसोबत घडल काय ?

निसर्ग पाहायला आले, मृत्यूला दिलं आलिंगन ; खान्देशातील तरुण-तरुणीसोबत घडल काय ?

July 30, 2025
शॉर्टसर्किटची भीषण घटना; रिक्षा जळाली, चालक अडचणीत

शॉर्टसर्किटची भीषण घटना; रिक्षा जळाली, चालक अडचणीत

July 30, 2025
बीड कारागृहातील स्पेशल फोनने उघडतील अनेक रहस्यं; आमदार सुरेश धसांचा दावा

बीड कारागृहातील स्पेशल फोनने उघडतील अनेक रहस्यं; आमदार सुरेश धसांचा दावा

July 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group