जळगाव मिरर / १३ एप्रिल २०२३ ।
राज्यातील प्रत्येक तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेली प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील ही नेहमीच तिच्या शोमुळे चर्चेत असते. कधी तिच्या शोला असलेली गर्दी चर्चेचं कारण ठरते तर कधी तिचा डान्स.
गौतमी गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गौतमी तिच्या लग्ना विषयी एका मुलाखतीत बोलली होती. तेव्हापासून तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. तर आता गौतमीनं तिची आई तिच्यासाठी खूप महत्त्वाची असून तिच्यासाठीच सगळं काही करत असल्याचं सांगत. जर वेळ आली तर नवऱ्याला सोडेन असं म्हटलं आहे.
गौतमीनं एका मुलाखतीत खुलासा केला आहे. या मुलाखतीत गौतमीनं तिच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केलं आहे. गौतमी यावेळी म्हणाली की ‘मी आईसाठी काम करते. माझं लग्न झाल्यानंतर तिचं काय होईल. ती कुठे जाणार, तिला कोण सांभाळणार, असे अनेक विचार मला येतात. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला सोडून तर मी जाणार नाही आणि समजा अशी वेळ आली तर मी नवऱ्याला सोडेन.’
