पाचोरा : प्रतिनिधी
येथील २० वर्षीय तरुण भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी पूर्व परीक्षा देवून घरी जात असतांना तालुक्यातील नेरी गावा दरम्यान, महिंद्रा पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत युवकाच्या डोक्याला जबरी मार लागल्याने तो जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, तेजस सुरेश महेर (वय – २० ) असे मृत तरुणाचे नाव असून तेजस कन्नड तालुक्यातील नागद गावाजवळील पांगरे या छोट्याशा गावात राहत होता. तेजसला सैन्यात भरती होण्यासाठी जळगांव येथे गुरुकुल अकॅडमीत प्रवेश घेतला होता. अकॅडमीत सैन्यभरती पूर्व परीक्षाचा शेवटचा पेपर देवून दि. ६ एप्रिल रोजी तेजस हा पाचोरा तालुक्यातील लोहटार येथे मुक्कामी थांबला होता. दि. ७ एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी लोहटार येथून नातेवाईकांची मोटारसायकल घेऊन पांगरे ता. कन्नड येथे जात असतांना चाळीसगाव तालुक्यातील भामरे गावाजवळ मालवाहू महिंद्रा पिकअप या चारचाकी वाहने मागवून त्यास जोरदार धडक दिली. वाहनाच्या जोरदार धडकेने तेजस हा जागेवर कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि तो जागेवरच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच भामरे गावातील काही नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन चारचाकी वाहन चालकास चांगलाच चोप देऊन तेजस महेर यांचेकडील असलेल्या मोबाईल वरून त्याचे बहिणीला फोन केल्यानंतर मयताची ओळख पटली.नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात येवून एकट हंबरडा फोडला. तेजस याचे पाश्चात्य आई, वडिल व एक बहिण असा परिवार असून तेजस हा आई – वडिलांना एकुलता एक मुलगा होता. . तेजसवर पांगरा ता. कन्नड येथे सायंकाळी नयन आश्रूंनी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मात्र तेजसचे सैन्यात भरती होवून देशसेवा करण्याचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले.
मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.



















