जळगाव मिरर / २४ एप्रिल २०२३ ।
जिल्ह्याच्या राजकारण आता पुन्हा एका निवडणुकीने तापायला लागलेले आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी जिल्हा सहकारी बँकेचे निवडणूक झाली होती. यात राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी बाजी मारली आहे. आता धरणगाव कृषी उत्पन्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव व नेत्यांचे फोटो बॅनरवरून तत्काळ काढावेत, अन्यथा आपणाविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारावजा आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांना दिले आहेत.
येत्या २८ एप्रिल रोजी धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. शिवसेना-भाजप- राष्ट्रवादीप्रणीत सहकार पॅनलच्या वतीने निवडणूक लढवीत आहोत असे बॅनर पवार यांनी लावलेले आहेत. पक्षामध्ये कोणत्याही पदावर कार्यरत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणताही गट नाही, असे असताना संजय पवार गट असा उल्लेख करून आपण पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहात. त्यामुळे तातडीने राष्ट्रवादी पक्षाचे नाव व नेत्यांचे फोटो काढावेत, अन्यथा आपल्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आदेशाच्या पत्रात म्हटले आहे.
