चोपडा : प्रतिनिधी
जळगावातील दोघांचा मित्रांचा चोपडा तालुक्यातील अडावद गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडला. ईश्वर सुदाम सुरळकर (35, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) व योगेश सुकलाल भावसार (34, रा.जगवाणी नगर, जळगाव) अशी मयतांची नावे आहे.
या सुरळकर व भावसार परिवाराला हे वृत्त समजताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.