यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील २४ वर्षीय विवाहितेचा मानलेल्या दिरानेच विनयभंगाच केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या विवाहितेने पोलीस स्थानक गाठत गुन्हा दाखल केला आहे.
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील २४ वर्षीय विवाहिता ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ती विवाहिता एका खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते. गुरूवार ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विवाहिता घरी असतांना तिचा चुलत मानलेला दिर याने तिच्या बेडरूममध्ये येवून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेबाबत विवाहितेने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दीराला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सोनवणे करीत आहे.