धुळे : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पक्ष प्रमुख माननीय उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख माननीय बबनराव थोरात , सहसंपर्कप्रमुख हिलालअण्णा माळी, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने बऱ्याच वर्षापासून शिवसेनेत निस्वार्थपणे काम करणारे कट्टर शिवसैनिक सुनील सूर्यवंशी यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र कक्षप्रमुख मंगेश चिवटे साहेब यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात ठाणे येथे धुळे जिल्हा समन्वय पदी नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विद्यमान तालुकाप्रमुख दिपक चोरमले. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जितेंद्र पाटील. उपस्थित होते.जिल्हा प्रमुख रावसाहेब हेमंत साळुंखे,कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू टेलर, उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ राजपूत, उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा,युवासेना उपजिल्हाधिकारी अनिकेत बोरसे,तालुका प्रमुख दिपक चोरमले, अत्तरसिंह पावरा,शिवसेना वाहतूक सेना जितेंद्रभाऊ पाटील, शहरप्रमुख मनोज धनगर आदीनीं अभिनंदन केले..