• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मोठा निर्णय : मंदिरात यायचं असेल तर मंदिराचं पावित्र्य टिकवूनच या !

महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला निर्णय ; जिल्ह्यातील या ३४ मंदिरांना नवा नियम लागू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 5, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मोठा निर्णय : मंदिरात यायचं असेल तर मंदिराचं पावित्र्य टिकवूनच या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ५ जून २०२३

मंदिरे ही हिंदू धर्माची ऊर्जा केंद्रे आहेत. या मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी, तसेच मंदिरात येणार्‍या भाविकाला मंदिरातील पवित्रकांचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी नागपूर, अमरावती, अहिल्यानगर (नगर) यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील 34 मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगावमध्ये या वर्षी 4 आणि 5 फेब्रुवारी 2023 मध्ये मंदिरे अन् धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ झालेल्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’त मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांच्या उपस्थितीत 31 मे या दिवशी झालेल्या बैठकीनंतर जळगावमधील प्रसिद्ध देवस्थान सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी, पारोळा येथील श्री बालाजी मंदिर यांसह अनेक मंदिरानी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला. त्यासंदर्भात *वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेल्या श्री ओंकारेश्वर मंदिर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने 5 जूनला पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये श्री बालाजी मंदिर, पारोळा; श्री मनुदेवी मंदिर, यावल; श्री पद्मालय देवस्थान, एरंडोल या मंदिरांसह 34 हून अधिक मंदिरात येत्या सप्ताहात तर जळगाव जिल्ह्यातील अन्य मंदिरांमध्ये येत्या 3 महिन्यांच्या कालावधीत वस्त्रसंहिता लागू करण्याचे घोषीत करण्यात आले.

ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने वर्ष 2020 मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली, तसेच देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी आस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. तसेच मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता असावी, असे मत या वेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी व्यक्त केले.

श्री. जुवेकर पुढे म्हणाले, ‘‘12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्वर मंदिर, अंमळनेर येथील श्री. देव मंगळग्रह मंदिर, वाराणसीचे श्री काशी-विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मानाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून सात्त्विक वस्त्रसंहिता लागू आहे. गोव्यातील बहुतांश मंदिरांसह ‘बेसिलिका ऑफ बॉर्न जीसस’ आणि ‘सी कैथऱ्ेडल’ या मोठ्या चर्चमध्येही वस्त्रसंहिता लागू आहे. महाराष्ट्र शासनाने ‘शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘जीन्स पँट’, ‘टी-शर्ट’, भडक रंगांचे किंवा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच ‘स्लीपर’ वापरण्यावर बंदी घातली आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून 1 जानेवारी 2016 पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली. तसेच मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ असू शकत नाही. प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे. आज मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली की, काही पुरोमागी, आधुनिकतावादी, व्यक्तीस्वातंत्र्यवाले लगेच याला विरोध करतात; मात्र पांढरा पायघोळ झगा घालणार्‍या ख्रिस्ती पाद्री, तोकडा पायजामा घालणारे मुल्ला-मौलवी वा काळा बुरखा घालणार्‍या मुसलमान महिला यांच्या वस्त्रांबद्दल ते आक्षेप घेत नाहीत.”

पारोळा बालाजी मंदिराचे विश्वस्त श्री. केशव क्षत्रिय म्हणाले की, भारतीय वस्त्र पाश्चात्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत. या वेळी बोलतांना सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिराचे सचिव श्री. नीलकंठ चौधरी म्हणाले की, ‘‘मंदिर संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे. मंदिरांची संस्कृती, पावित्र्य आणि मांगल्य टिकून रहाण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मंदिरात प्रवेश करतांना अंगप्रदर्शन करणारे, अशोभनीय आणि तोकडे कपडे घालून येऊ नये अशी आमची भूमिका असून यासाठी आम्ही वस्त्रसंहिता लागू करत आहोत. यासाठी श्री मनुदेवी मंदिर, यावल याठिकाणी ही फलक लावत आहोत.

सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी वस्त्रसंहितेचे अध्यात्मिक स्तरावर काय महत्व आहे ते विशद करून वस्त्रसंहितेचे पालन करणार्‍याला मंदिरात दर्शन घेण्याचा लाभ कसा होतो याविषयी सांगितले. ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे विधी सल्लागार आणि महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे माजी चेअरमन ज्येष्ठ विधिज्ञ भरत देशमुख म्हणाले की, मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करणे म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणे असे नाही. तर ते मंदिराच पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे, तसेच भारतीय वस्त्र घातल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार-प्रसार होण्यासह तिच्याविषयी युवा पिढीमध्ये स्वाभिमानही जागृत होईल. तसेच पाश्चात्त्यांच्या तुलनेत पारंपारिक वस्त्रनिर्मिती करणार्‍या उद्योगाला चालना मिळेल. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल, तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असायला हवी, अशी महाराष्ट्र मंदिर महासंघाची भूमिका आहे. जळगाव येथील ओंकारेश्वर मंदिराचे श्री. जुगल किशोर जोशी आणि एरंडोल येथील प्राचीन श्री पद्मालय मंदिराचे विश्वस्त डॉ. पांडुरंग पिंगळे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.

येथे लागू होणार वस्त्रसंहिता !

1. श्री ओंकारेश्वर मंदिर, जळगाव; 2. श्री बालाजी मंदिर पारोळा; 3. महर्षी व्यास मंदिर, यावल; 4. श्री पद्मालय देवस्थान, एरंडोल; 5. कष्टभंजन देव हनुमानजी मंदिर, सूनसावखेडा; 6. सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर, यावल; 7. श्रीराम मंदिर, पारोळा; 8. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पिंपरी, जामनेर; 9. श्री मारुती मंदिर, प्रजापतीनगर, जळगाव; 10. पंचमुखी मारुती मंदिर, जळगाव; 11. श्री शनी मंदिर, सिंधी कॉलनी, जळगाव; 12. दक्षिणमुखी मारुती मंदिर, गोलाणी माकर्ेट, जळगाव; 13. श्री उमामहेश्वर मंदिर, उमाळे, ता.जि. जळगाव; 14. शिवधाम मंदिर, जळगाव; 15. श्री इच्छादेवी मंदिर, जळगाव; 16. श्री कालिका माता मंदिर, जळगाव; 17. सूर्यमुखी हनुमान मंदिर, विवेकानंदनगर, जळगाव; 18. श्री अष्टभुजा मंदिर, भुसावळ; 19. स्वयंभू श्री मुजुमदार गणपती मंदिर, चोपडा; 20. श्री हरेश्वर महादेव मंदिर, चोपडा; 21. बालवीर हनुमान मंदिर, चोपडा; 22. नवग्रह मंदिर, शेतपुरा, चोपडा; 23. श्री वरदविनायक मंदिर, प्रेमनगर, जळगाव; 24. श्री गजानन महाराज मंदिर, बांभोरी; 25. सातपुडा निवासिनी श्री भवानीमाता मंदिर, कुसुम्बा, रावेर; 26. श्री साई मंदिर, तुळसाईनगर, जळगाव. यांसह दसनूर येथील मंदिर, पाचोरा येथील 2 मंदिरे आणि भादली येथील 6 मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू होणार आहे. अशी एकूण 34 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार आहे.

Tags: #jalgaon

Related Posts

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !
जळगाव

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026
पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !
क्राईम

पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

February 7, 2026
भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ
क्राईम

भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ

February 7, 2026
पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !
क्राईम

अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहामागील रहस्य उलगडले : प्रेमसंबंधातून खून, संशयित अटकेत !

February 6, 2026
पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !
जळगाव ग्रामीण

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

February 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरमध्ये खून; पती ताब्यात

February 7, 2026
पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

February 7, 2026
भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ

भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ

February 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group