जळगाव मिरर | १२ जून २०२३
शहरातील एका २० वर्षीय तरुणीचा एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर शहरातील तरुणी जळगाव शहरातील एका मुलीच्या होस्टेल येथे असतांना दि.१० रोजी संद्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपीने तरुणीच्या मोबाईलवर फोन करून तिला उद्या तु मला एका हॉटेल येथे भेटायला ये असे वाईट बोलला तर दि ११ रोजी मध्यरात्री २ ते ३.३० वाजेच्या सुमारास तरुणीला तब्बल ३१ वेळा काही एक काम नसताना फोन करून तरुणीचा बुलेट दुचाकीने पाठलाग करीत विनयभंग केल्याने तरुणीने रामानंद पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.सुनील पाटील हे करीत आहेत.




















