जळगाव मिरर | १३ जून २०२३
जळगाव नगरीला वस्त्रनगरीची एक नवीन ओळख व लौकिक प्राप्त करून देणारे तसेच वस्त्र खरेदीसाठी वर्षानुवर्षे ग्राहकांचे ऋणानुबंध जपलेले व पसंतीस उतरलेले एकमेव दालन म्हणजे ‘सुरेश कलेक्शन्स् अॅण्ड क्रिएशन’ यंदाच्या लग्नसराईत विविध वस्त्रांच्या फ्रेश स्टॉकद्वारे सजले असून खरेदीसाठी ग्राहकांची पसंती मिळत आहे.

छत्रपती शिवाजीनगर येथील ८० फुटी कानळदा रिंगरोड, राधाकृष्णनगर चौक परिसर येथील ‘सुरेश कलेक्शन्स् ॲण्ड क्रिएशन’च्या अद्ययावत दालनात विविध व्हरायटीची वस्त्रश्रृंखला एकाच छताखाली उपलब्ध आहे. साखरपुडा, प्री-वेडिंग फोटोशूट, हळद, संगीत- संध्या लग्नसोहळा, रिसेप्शन अशा वेगवेगळ्या रंगसंगतीतील पेहराव उपलब्ध असल्याचे संचालक मुकेश हासवानी यांनी सांगितले आहे.




















