जळगाव मिरर / १४ जून २०२३
जळगाव शहराचे आ.राजुमामा भोळे यांचा वाढदिवस जळगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी आ.राजुमामा भोळे व त्यांच्या परिवाराने पंढरपूर येथे पांडुरंगाचे व केशवराय श्री नामदेव मंदिराचे दर्शन घेतले.

या प्रसंगी संत नामदेव महाराज चे 16 वे वंशज ह भ प मुकुंद महाराज व 17 वंशज एकनाथ महाराज यांनी विशाल भोळे व डॉ.सौ.जुही भोळे यांनी केशवरायाची सपत्नीक पुजा केली. यावेळी माजी महापौर सिमाताई भोळे देखील उपस्थित होते. त्यानंतर जळगाव शहराच्या विकासासाठी आ.राजुमामा भोळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी दिल्ली येथे रवाना झाले असल्याची माहिती मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.




















