जळगाव मिरर | २२ जून २०२३
जामनेर तालुक्यातील एका गावातील ४५ वर्षीय वृद्धाचा उसनवारीच्या पैश्यातून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील संशयित आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील जांभूळ या गावातील रहिवासी असलेले कैलास विठोबा वडाळे हे दि १३ जून रोजी दुपारी ३ वाजेनंतर वेळ माहित नाही उसनवारीने दिलेले पैसे संशयित आरोपी रमेश मोरे यांना मागण्याचा तगादा लावत असल्याच्या कारणावरून संशयित आरोपीने कैलास वडाळे यांना मारून फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. यात या वडाळे नामक वृद्धाचा खून झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी पहूर पोलिसांनी मयत असलेल्या कैलास वडाळे यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी रमेश मोरे यास ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोनि.प्रताप इंगळे हे करीत आहेत.