जळगाव मिरर | २१ जुलै २०२३
अमळनेर शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आपल्या जन्मदत्यानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बुधवारी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपले आई व वडील यांच्यासोबत वास्तव्यास असून गेल्या दिड वर्षापासून आई-वडील यांच्यात भांडण सुरु आहे. त्यामुळे भांडण झाल्यावर आई बाहेरगावी निघून जात असे. त्यामुळे अल्पवयीन मुलगी वडिलासोबत घरीच राहून शाळेत जात असते. याच गोष्टीचा नराधम बाप फायदा घ्यायचा. रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात झोपून गेली कि, अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करायचा. मुलीने विरोध केला असता तुला आणि तुझ्या आईला मारेन अशी धमकी द्यायचा. वेळोवेळी आई बाहेर गावी गेल्यावर रात्रीच्या वेळेस नेहमीच नराधम बाप पिडीतेसोबत संबंध ठेऊ लागला होता. भीतीने सदर प्रकाराबाबात पिडीतेने कुणालाही सांगितले नाही. २१ एप्रिल पासून वडिलांसोबत भांडण झाल्यापासून पिडीतेची आई भाहेर निघून गेली होती. १५ तारखेला वडिलांनी केलेला अत्याचारनंतर दीड वर्षापासून सुरु असलेला छळ पिडीतेला असहय झाला. दि. १८ रोजी आई आजीसह घरी परत आल्यावर दि १९ रोजी रोजी रात्रीच्या वेळेस आई व आजी यांना सदर घटनेबाबत पिडीतेने सविस्तर सांगीतले. त्यानंतर दि. २० रोजी पिडीतेने आईसोबत पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तात्काळ नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सपोनी हरीदास बोचरे हे करीत आहेत.