जळगाव मिरर | २१ जुलै २०२३
राज्यातील शिंदे व ठाकरे गटामध्ये थोड्या – थोड्या मुद्द्यावरून दिग्गज नेत्यामध्ये जोरदार टीका टिपण्णी सुरु होत असते. आज देखील विधानसभेत ठाकरे गटाचे नेते आ.आदित्य ठाकरे विरुद्ध गुलाबराव पाटील यांच्यात चांगलाच सामना रंगला आहे. खातेवाटपावरून यांच्यात खडाजंगी झाली. या दोघांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खुर्चीवरुन उठून शांत केले.
आदित्य ठाकरे म्हणाले, सभागृह सुरू होण्यापूर्वी मंत्र्यांचा खातेवाटप होतो. यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवरील भार कमी होतो. प्रत्येक दिवशी खातेवाटप होतो. एखाद्या मंत्र्यांला उत्तर देता आले नाही तर टाईमपास होतो. आम्ही सगळे आमच्या मतदारसंघातून येतो. महाराष्ट्रात आम्ही आवाज देतो. यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले, अधिवेशनापूर्ती जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे दिली आहे. त्यांची यादी मी काल सभागृहात वाचून दाखवली. त्यामुळे ह्या प्रश्नाच चर्चा नको.
गुलाबराव पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे फार अभ्यास करुन आले आहेत. मला माहित आहे. ऐनवेळी सर्व प्रश्न आले. यावेळी आदित्य ठाकरे मध्ये बोलत होते. तर गुलाबराव पाटील म्हणाले. मायच्या पोटी कोणी हुशार होवून जन्माला येत नाही. तुम्हाला विमानतळाचे प्रश्न माहित असतील. या वक्तव्यामुळे आदित्य ठाकरे आक्रमक झाले. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी सर्वांना शांत केले.