जळगाव मिरर | २८ जुलै २०२३
जामनेर तालुक्यातील एका गावातील ३२ वर्षीय महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पहुर पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या एका गावातील 32 वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे . दिनांक २६ रोजी ही महिला घरात काटेवर झोपलेली असताना त्यावेळेस त्याच गावातील एक समस्येत आरोग्य तिच्याजवळ येऊन चुकीचे वर्तन करीत त्यावेळी महिलेला लज्जा उत्पन्न झाल्याने त्या तरुणा विरोधात पहूर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक सुभाष पाटील हे करीत आहे