जळगाव मिरर | ३० जुलै २०२३
जळगाव शहरातील नवीन शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत दोन दिवसा आधी एका वाळू व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार झाला होता त्यातील आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हि घटना ताजी असतांना शनिवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हा दूध संघामध्ये एका दिग्गज पदाधिकाऱ्याने दूध संघाच्या अधिकाऱ्यावर पिस्तूल रोखल्याची चर्चा शनिवारी रात्री सुरू झाली. त्यानंतर घटनास्थळी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तर शहर पोलिसांची देखील तारांबळ उडाली होती. मात्र या विषयी पोलिसांनी नकार दिला. रात्री उशिरापर्यंत याला दुजोरा मिळू शकला नाही. या विषयी शहर पोलिस ठाण्यातदेखील पोलिस अधिकारी, कर्मचारी हजर झाले.
सोबतच माध्यम प्रतिनिधीदेखील तेथे पोहचले. पोलिसांनी या अधिकाऱ्याकडे विचारणा केली, मात्र तसा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगितले. या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील हेदेखील आले होते. त्यांच्यासह शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनीही असा प्रकार झाला नसल्याचे सांगितले.